Jump to content

"चतुरंग प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३६: ओळ ३६:


==रंगसंमेलन नामक कार्यक्रमांत चतुरंग जीवनगौरव पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती==
==रंगसंमेलन नामक कार्यक्रमांत चतुरंग जीवनगौरव पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती==
* इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२)
* प्रा. मधुसूदन कौंडीण्य (१९९३)
* पु.ल. देशपांडे (१९९४)
* पु.ल. देशपांडे (१९९४)
* डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५)
* लता मंगेशकर (२००० )
* सुधीर फडके (१९९६)
* प्रा. राम जोशी (१९९७)
* श्री. पु. भागवत (१९९८ की २००२?)
* पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९)
* लता मंगेशकर (२०००)
* बॅरिस्टर पी. जी. पाटील (२००१)
* नानाजी देशमुख (२००३)
* पार्वतीकुमार (२००४)
* डॉ. जयंत नारळीकर (२००५)
* नटवर्य [[भालचंद्र पेंढारकर|भालचंद्र पेंढारकरांना]] (२००६)
* नटवर्य [[भालचंद्र पेंढारकर|भालचंद्र पेंढारकरांना]] (२००६)
* साधनाताई आमटे (२००७)
* पंडित सत्यदेव दुबे (२००८)
* पंडित सत्यदेव दुबे (२००८)
* डॉ.राम ताकवले (२००९)
* डॉ. अशोक रानडे (२०१०)
* शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी (२०११)
* विजया मेहता (२०१२)
* विजया मेहता (२०१२)



१८:०६, १५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेची १९७४मधे स्थापना झाली. ह्या संस्थेने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची अनोख्या पद्धतीने मुहूर्तमेढ रोवली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वैचारिक मंथन, व्याख्यान, परिसंवाद, चर्चा आदींचा समावेश असतो. पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. भवानीशंकर, पं. काशीनाथ बोडस, वीणा सहस्त्रबुद्धे, अरीण चांदीवाले, पं. यशवंतबुवा जोशी , कविवर्य वसंत बापट, न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड, अर्थतज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सुनील गावस्कर, व्हाइस ॲड. मनोहर आवटी, एअर मार्शल सदानंद कुलकर्णी, लेफ्ट. अशोक जोशी, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. शिवाजीराव भोसले, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार अशा अनेकांनी चतुरंगच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे.

चतुरंग प्रतिष्ठानचे सांस्कृतिक कार्यक्रम

  • एक कलाकार - एक संध्याकाळ हा कार्यक्रम
  • चैत्रपालवी
  • सवाई एकांकिका
  • मुक्तसंध्या
  • वर्षातून एकदा दोन दिवसीय रंगसंमेलन सायं ६ ते रात्री १२ यावेळेत
  • गौरवसोहळा : या सोहळ्यात समाज, संस्कृती, साहित्य, शिक्षण, संगीत, चित्रपट, नाटक, नृत्य अशा क्षेत्रांतून देदीप्यमान कार्य करणाऱ्याला चतुरंग जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.

सांस्कृतिक कार्यक्रमांमधून झालेले करमणुकीचे कार्यक्रम

  • विनोदसम्राटांचा हास्यदरबार : यात गेल्या जमान्यातील शरद तळवलकरांपासून ते अगदी आजच्या काळातील विजय कदम, प्रदीप पटवर्धनांपर्यंत विविध स्टाईलचे कलाकार एकत्र आले होते.
  • लोकनृत्ये : गढवाली, बिहारी, जोगवा, पतंगाची लावणी, करघटम् अशा प्रकारचे विविध नृत्यप्रकार एकाच कार्यक्रमात
  • संगीत, नृत्ये, मुलाखती, एकांकिका, व्याख्याने, खेळ, बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग वगैरे
  • सुधीर फडके यांचे गीत गायन
  • मन्ना डे यांचे गीतगायन
  • शंकर महादेवन्, फजल कुरेशी, रतन शर्मा, श्रीधर पार्थसारथी यांसारख्या वेगवेगळ्या बाजाचे गायक-वादक एकत्र आणत त्यांच्या सांगीतिक जुगलबंदीचा कार्यक्रम
  • वादळवाट, प्रपंच यांसारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमाधील संपूर्ण टीमच्याच हस्ते रंगसंमेलनाचे उद्‌घाटन
  • गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिका यांना एकत्र आणून गीतांच्या जन्मकथा, गप्पागोष्टींसह लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम
  • वाद्य आणि गायन यांच्यात किंवा नाट्यसंगीतामधेही रंगतदार जुगलबंदी
  • ’क्षितिजापलिकडील लयीची शोधयात्रा’ अंतर्गत पं.सुरेश तळवलकर आणि अन्य कलाकारांनी विविध वाद्य आणि गायनातून घेतलेला वेध
  • २००१ च्या रंगसंमेलनात ’फुललेल्या चांदण्यांच्या मळ्यात’ या कार्यक्रमात श्रीनिवास खळे यांचे गीतगायन
  • २००४ मध्ये ’शुभ्र फुलांची ज्वा्ला’अंतर्गत पं. वसंतराव देशपांडेंच्या गायकीचे साक्षात दर्शन त्यांचा नातू राहुल देशपांडे याच्याकडून
  • २००६ साली ’रंगी रंगला भालचंद्र’ या कार्यक्रमात भालचंद्र पेंढारकरांच्या गाजलेल्या भूमिका आणि त्यांची नाट्यपदे हा कार्यक्रम
  • सुधीर - माणिक गीते या कार्यक्रमातून सुधीर फडके आणि कै. माणिक वर्मा यांना दिलेली स्वरवंदना
  • जिंगल्स ते चित्रपट संगीतापर्यंतचा अशोक पत्कींचा सांगीतिक प्रवास
  • ’दरबार हजारी मनसबदारांचा’ ह्या शीर्षकांतर्गत १९९२ साली चतुरंगने रंगसंमेलनामध्ये १००० पेक्षा अधिक नाट्यप्रयोग करणाऱ्या नाट्यनिर्मात्यांचा सत्कार केला होता. त्यात नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांपासून ते नानासाहेब शिरगोपीकरांपर्यंत मान्यवरांची उपस्थिती होती’
  • १९९३साली ’चाळ नावाची वाचाळ वस्ती’चा अफलातून नाट्यरंगाविष्कार साकारण्यात आला. चाळीतल्या जीवनाचे वास्तव दर्शन घडविणारी, तिथे राहणाऱ्यांच्या नाना जाती व अन्य पैलू मांडणारी ही मालिका अतिशय लोकप्रिय होती, त्यावरच हा प्रयोग इथे बेतलेला होता.
  • सचिन शंकरचा बॅले, सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांचा बॅले, सैन्य चालले पुढे सारखा देशाच्या संरक्षणव्यवस्थेवर आधारित कार्यक्रम.

विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

  • कोकणातील १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांकरिता खास निर्धार निवासी अभ्यासवर्ग
  • कोकणातील १०वी १२वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासवर्ग
  • गुणवंत विद्यार्थी गौरव
  • विद्याधर गोखले करंडक स्पर्धा

रंगसंमेलन नामक कार्यक्रमांत चतुरंग जीवनगौरव पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती

  • इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२)
  • प्रा. मधुसूदन कौंडीण्य (१९९३)
  • पु.ल. देशपांडे (१९९४)
  • डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५)
  • सुधीर फडके (१९९६)
  • प्रा. राम जोशी (१९९७)
  • श्री. पु. भागवत (१९९८ की २००२?)
  • पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९)
  • लता मंगेशकर (२०००)
  • बॅरिस्टर पी. जी. पाटील (२००१)
  • नानाजी देशमुख (२००३)
  • पार्वतीकुमार (२००४)
  • डॉ. जयंत नारळीकर (२००५)
  • नटवर्य भालचंद्र पेंढारकरांना (२००६)
  • साधनाताई आमटे (२००७)
  • पंडित सत्यदेव दुबे (२००८)
  • डॉ.राम ताकवले (२००९)
  • डॉ. अशोक रानडे (२०१०)
  • शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी (२०११)
  • विजया मेहता (२०१२)

अन्य

  • कार्यकर्ता शिबीर
  • वार्षिक स्मरणिका प्रकाशन : स्मरणिकेतून संस्थात्मक कार्याचा आढावा घेत घेत अनेक समाजसेवी संस्थांचा, पुरस्कार सन्मानित व्यक्तीचा आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय
  • चतुरंरंग प्रतिष्ठानच्या द्विदिवसीय रंगसंमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात चहापान संमेलनाने होते. सामान्य माणसांना या निमित्ताने मान्यवरांना भेटता येते आणि त्यांच्याशी गप्पा मारता येतात.