"अरविंद पिळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''अरविंद पिळगावकर''' (जन्म : १८-१०-१९३७) हे मराठी नाट्यअभिनेते आहेत. ... |
(काही फरक नाही)
|
२२:३१, ९ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
अरविंद पिळगावकर (जन्म : १८-१०-१९३७) हे मराठी नाट्यअभिनेते आहेत. १९६४ साली त्यांनी ’यशवंतराव होळकर’या नाटातून रंगभूमीवर पदार्पण केले. ते गायक नट आहेत. संगीत नाट्यप्रशिक्षक म्हणून ते काम करीत असत.
अरविंद पिळगावकरांनी भूमिका केलेली नाटके (कंसात भूमिका)
- अमृत मोहिनी (विष्णू)
- इंद्रजित वध (परिपार्श्वक)
- एकच प्याला (रामलाल)
- कृष्णार्जुन युद्ध (कृष्ण)
- घनश्याम नयनी आला (युवराज)
- जय जगदीश हरे (जयदेव)
- दशावतारे राजा (नारद)
- धाडिला राम तिने का वनी? (भरत)
- नयन तुझे जादुगार (प्रसाद)
- पंढरपूर (लिंबाजी)
- पुण्यप्रभाव (भूपाल)
- प्रीतिसंगम (खलनायक)
- बावनखणी ( सुखदेव/बाजीराव
- भाव तोचि देव (एकनाथ)
- सं. भावबंधन (प्रभाकर)
- महाश्वेता (पुंडलिक)
- माझा होशिल का ()
- माता न तू वैरिणी (कुणाल)
- सं. मानापमान (धैर्यधर, लक्ष्मीधर)
- सं. मृच्छकटिक (शर्विलक)
- यशवंतराव होळकर (पठाण)
- रीत अशी प्रीतीची (कृष्ण)
- लाडकी लक्ष्मी (विष्णू)
- वाऱ्यावरची वरात (देसाई)
- सं. वासवदत्ता (उदयन)
- विठो रखुमाय ( माळी राया/मांत्रिक)
- सं. विद्याहरण (कच)
- सं. शारदा (कोदंड)
- शेपटीचा शाप (कवी)
- शोभिली भगिनी कृष्णाला (कृष्ण)
- संत कान्होपात्रा (चोखा मेळा)
- संत नामदेव (नामदेव)
- सं. संशयकल्लोळ (अश्विनशेठ/साधू)
- सोन्याची द्वारका (सुदाम)
- सं. सौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद, सूत्रधार)
- स्वयंवर (भीष्मक)
पुरस्कार
अरविंद पिळगावकरांना महाराष्ट्र सरकारकडून अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
[वर्ग: