"सोरठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''सोरठा''' हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. '''सोरठाम''... |
(काही फरक नाही)
|
००:१९, ६ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
सोरठा हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. सोरठामध्ये चार चरण असून विषम क्रमांकाच्या चरणांमध्ये ११ आणि सम क्रमांकाच्या चरणांत १३ मात्रा असतात. विषम चरणातील शेवटून दुसरे अक्षर गुरु आणि शेवटचे अक्षर लघु असणे आवश्यक आहे.
दोहा हा छंद सोरठाच्या अगदी विरुद्ध असतो. त्याच्या सम क्रमांकाच्या ओळीत १३ आणि सम क्रमांकाच्या ओळीत ११ मात्रा असतात.
सोरठाचे उदाहरण -
जो सुमिरत सिधि होय,
गननायक करिबर बदन।
करहु अनुग्रह सोय,
बुद्धि रासि सुभ गुन सदन॥
दोह्याचे उदाहरण -
मुरली वाले मोहना,
मुरली नेक बजाय ।
तेरी मुरली मन हरो,
घर अँगना न सुहाय॥