Jump to content

"दोहा (छंद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दोहा हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. दोह्यामध्य...
(काही फरक नाही)

२०:०३, ५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

दोहा हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. दोह्यामध्ये चार चरण असून विषम क्रमांकाच्या चरणांमध्ये १३ आणि सम क्रमांकाच्या चरणांत ११ मात्रा असतात. विषम चरणाच्या सुरुवातीला ’ज‘गण ( । ऽ ।-- लघुगुरुलघु ) असू नये. सम चरणातील शेवटून दुसरे अक्षर गुरु आणि शेवटचे अक्षर लघु असणे आवश्यक आहे.

उदाहरण -

मुरली वाले मोहना,
मुरली नेक बजाय ।
तेरी मुरली मन हरो,
घर अँगना न सुहाय॥