Jump to content

"वासुदेव रामचंद्र भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रावबहादुर डॉ. वासुदेव रामचंद्र भट (जन्म : २८-२-१९७२; मृत्यू : ), D.P...
(काही फरक नाही)

१५:१४, २३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

रावबहादुर डॉ. वासुदेव रामचंद्र भट (जन्म : २८-२-१९७२; मृत्यू : ), D.P.H. (केंब्रिज), L.R.C.P.&S. (एडिंबरो), L.F.P.&S.(ग्लासगो) हे अमरावतीत राहून खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर होते.

शिक्षण, विवाह

त्यांचे इंटरपर्यंतचे शिक्षण जबलपूरम्ध्ये, वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये आणि एडिंबरो येथे, आणि नंतरचे लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये झाले होते. त्यांचे (दुसरे) लग्न अखिल हिंदुस्थानी महिला परिषदेच्या अमरावती येथील शाखेच्या अध्यक्ष असलेल्या सावित्रीबाईशी झाले. ते L.R.C.P.S. ची परीक्षा इ.स.१८९९मध्ये व D.P.H.ची इ.स.१९००मध्ये उत्तीर्ण झाले. डॉ. भट हे एडिंबरोतील रुग्णालयात निवासी डॉक्टर होते.

व्यवसाय

रावबहादुर डॉ. यांनी इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण करून हिंदुस्थानात आल्यावर अमरावती शहरात इ.स.१९०२मध्ये प्रॅक्टिस सुरू केली. ते अमरावती नगरपालिकेचे २५ वर्षे नगरसेवक होते. ते मध्य प्रांताच्या शालेय परीक्षा बोर्डाचे सदस्य, सांडपाणी बोर्डाचे सदस्य, व अखिल हिंदुस्थानी वैद्यकीय बोर्डाचे सदस्य होते. शिवाय ते मध्य प्रांताच्या सरकारी कर्माचाऱ्यांच्या नोकरीपूर्व निवडसमितीवर असत.

समाजकार्य

राव्बहादुर वासुदेव रामचंद्र भट हे अखिल हिंदुस्थानी पददलित समाज उत्कर्ष समितीच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष व चोखामेळा विद्यार्थी वसतीगृहावर उपाध्यक्ष होते.

मानसन्मान

त्यांनी अमरावतीत केलेल्या समाजकार्यासाठी सरकारने त्याना १९१६साली रावबहादुर या उपाधीने सन्मानित केले. १९३५साली त्यांना ज्युबिली मेडल देण्यात आले.


पहा

पुरस्कार