Jump to content

"गारुडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''गारुडी''' ही एक भटकी जमात आहे. साप आणि नाग पकडणे हा त्यांचा व्यवसा...
(काही फरक नाही)

२२:५५, ६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

गारुडी ही एक भटकी जमात आहे. साप आणि नाग पकडणे हा त्यांचा व्यवसाय आहे. फिरत फिरत ते जेव्हा गावातील एखाद्या छोट्या मैदानवजा मोकळ्या जागेत येतात, तेव्हा ते ढोल पिटून गावातील मुलेबाळे जमा करतात. मुलांपाठोपाठ हळूहळू मोठेही येतात. पुरेशी माणसे जमा झाली की ढोल वाजवणे थांबते. मैदानावर दोनचार पेटारे व साप-नाग ठेवलेलेच असतात. तिथेच सापाच्या चपट्या करंड्याही असतात. मध्येच एखादा अजगर मोकळा सोडलेला असतो. आणि गारुडी खेळ सुरू करतो. गारुड्याचा हंडीबाग नावाचा एक पोरगा असतो. जादुगाराच्या प्रश्नांना तो न कंटाळता उत्तरे देत असतो. गारुडी पत्त्यांची जादू करतो, रुमाल, रिबिनी रुपयाचे नाणे वगैरे अदृश्य करण्याचे खेळ करतो. आणि मग तो साप-मुंगुसांची लढाई लावतो. साप-मुंगुसांची बराच वेळ एकमेकांना चुकवाचुकवी झाल्यावर गारुडी सापाला परत करंडीत बंद करतो. पुंगी वाजवून नागाला डोलवतो. आणि नंतर हंडीबागला झोपवून त्याच्यावर चादर अंथरतो. तो त्याला प्रेक्षकांपैकी कोणाच्या खिशात काय आहे ते विचारतो. उत्तरे अचूक आल्यानंतर लोकांचा गारुड्यावर विश्वास बसतो. गारुडी नंतर कुठले तरी दंतमंजन किंवा औषध विकायला काढतो. आणि शेवटी कटोरा घेऊन प्रेक्षकांकडून पैसे जमा करतो.

गारुडी ही खेड्यातीलच नाही तर शहरातल्या लोकांचीही अल्प पैशातली करमणूक असते. नागपंचमीच्या दिवशी गारुडी नाग घेऊन घरोघर हिंडतात आणि नागासाठी दूध आणि पैसे गोळा करतात.

पहा : भटके कलावंत आणि भिक्षेकरी