"वडारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''वडारी''' आणि बेलदार या प्रामुख्याने मातीकाम करणाऱ्या जमाती आहेत.... |
(काही फरक नाही)
|
२२:१०, ६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
वडारी आणि बेलदार या प्रामुख्याने मातीकाम करणाऱ्या जमाती आहेत. मातीचे डोंगर करणे, मातीचे ढीग उपसणे, शेतांना बांध घालणे, शेतांतली माती सपाट करणे ही कामे वडारी करतात, तर तण माजलेली शेते लागवडीस आणणे ही कामे बेलदार करतात. शिवाय बेलदारांकडे गाढवे असल्याने ते माती आणि विटांची ने-आण करतात. विहिरी खणणे, सुरुंग लावून दगड फोडणे किंवा दगडाच्या खाणी पाडणे ही काम वडाऱ्यांची असतात.
वडारांच्या बायका चोळी घालीत नाहीत. त्या घरबसल्या दगडी जाते, उखळ, पाटा, वरवंटा तयार करणे, पाट्याला ताके मारून देणेवगैरे कामे करतात. त्यांची मातृभाषा कानडीची एक बोलीभाषा आहे. शिवाय त्या वडारी पुरुषांबरोबर बांधकामावर मजुरी करून उदरनिर्वाह करतात. प्रत्येक शहरामध्ये एक वडारवाडी असते, तेथे या लोकांची वस्ती असते.
पहा: