"पोतराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''कडकलक्ष्मी''' नावाची दारी येणारी भिक्षेकरीण 'दार उघड बया आता दार ... |
(काही फरक नाही)
|
१५:२२, ६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण 'दार उघड बया आता दार उघड' असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागते. या कडकलक्ष्मीला पोतराज असेही म्हणतात. हातातल्या कोरड्याने (हंटरने) स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात रस्तोरस्ती फिरणाऱ्या या पोतराज किंवा कडकलक्ष्मीच्या मोकळ्या सोडलेल्या केसात जटा झालेल्या असतात, किंवा त्याने क्वचित केसांचा अंबाडा बांधलेला असतो. कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र नेसलेला, गळ्यात मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंघराची माळ बांधलेला आणि पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज लहान मुलांना भीतिदायक वाटतो. आपल्या हातातील कोरड्याचे कधी स्वतःच्याच शरीरावर प्रहार करीत तर कधी नुसतेच हवेत 'सट सट' आवाज काढीत तो मरीआईच्या नावाने दान मागतो.