"प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: रंगभूमिविषयक कामासाठी दिला जाणारा हा महाराष्ट्र सरकारचा नटवर्... |
(काही फरक नाही)
|
१४:३९, ४ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
रंगभूमिविषयक कामासाठी दिला जाणारा हा महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आहे. या पुरस्काराच्या नावात पूर्वी प्रभाकर पणशीकर हे शब्द नव्हते. तेव्हा हा पुरस्कार खुद्द प्रभाकर पणशीकरांनाच दिला गेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने हा पुरस्कार विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर आणि आत्माराम भेंडे(२०१२) याना दिला गेला. हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो. या पुरस्काराचे स्वरूप हे मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ आणि पाच लाख रुपये रोख असे आहे.