Jump to content

"महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार : == भुईकोट क...
(काही फरक नाही)

१२:३५, १ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार : == भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)== : यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे तर असंख्य आहेत.

काही भुईकोट किल्ले

  • अचलपूरचा किल्ला
  • अमरावतीचा किल्ला
  • अहमदनगरचा किल्ला
  • अकोल्याचा किल्ला
  • जलदुर्ग : समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.
  • डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग): हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससेमिरा थांबायचा.

या सर्व प्रकारच्या किल्ल्यांच्या भागांना काही तांत्रिक नावे आहेत. किल्ल्यांच्या अशा अवयवांची ही माहिती :

प्रवेशद्वार

बुरूज

बालेकिल्ला

कुसव

तट

(अपूर्ण)