"मारुती दाजी देवकाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मारुती दाजी ऊर्फ मा.दा.देवकाते (जन्म : १९४१ ; मृत्यू : पुणे, १९-१-२०११)... |
(काही फरक नाही)
|
१४:२८, ३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
मारुती दाजी ऊर्फ मा.दा.देवकाते (जन्म : १९४१ ; मृत्यू : पुणे, १९-१-२०११) हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक संवाद लेखक होते. ते मूळचे बारामती(पुणे जिल्हा) तालुक्यातल्या नीरा-वागज या गावचे. देवकाते यांनी एकूण ४० वर्षांत सुमारे १५० चित्रपटाच्या पटकथा, संवादलेखन आणि गीतलेखन केले होते.
ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे १९७५पासून सक्रिय सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर बारामती येथे भरलेल्या नवोदित मराठी साहित्य संमेलनासाठी वसंतराव पवार नाट्यगृहाचे रूपांतर ’मा.दा.देवकाते साहित्यनगरी’ असे करण्यात आले होते.
मा.दा.देवकाते यांनी संवादलेखन केलेले चित्रपट
- जन्म हा तुझ्यासाठी
- जय तुळजाभवानी
- डाळिंबी
- थापाड्या
- दैवत असे
- पटलं तर व्हंय म्हणा
- पांडोबा पोरगी फसली
- पैजेचा विडा
- भटकभवानी
- भन्नाट भानू
- भामटा
- रंगू बाजारला जाते
- सूनबाई ओटी भरून जा
- सौभाग्यकंकण
- हळद रुसली कुंकू हसलं
गीतलेखन केलेल चित्रपट
- जवळ ये लाजू नको(कृष्णधवल, १९७६)
- भाग्यवती मी या संसारी(१९७१)
मा.दा.देवकाते यांची ग्रंथसंपदा
- आता तुझी पाळी (सुकृत प्रकाशन)
- कसेल त्याची जमीन (२००९)
- कळप मिळाला मेंढराला (प्रतीक प्रकाशन, पुणे)
- किऴस (तीरंदाज प्रकाशन, १९६७)
- गीत भीमाचे गाऊ या (सुगावा प्रकाशन)
- थापाड्या (सुकृत प्रकाशन)
- दामिनी (सुगावा प्रकाशन)
- दुभंग (त्रिनेत्र प्रकाशन)
- बळीचा बकरा (सुपर्ण प्रकाशन)
- बुरखा (त्रिनेत्र प्रकाशन, २००८)
- बूमरँग (नंदादीप बुक सर्व्हिसेस)
- महात्मा जोतिबा फुले(प्रतीक प्रकाशन, पुणे)
- रॅगिंग (सुकृत प्रकाशन)
- रात्र पेटली अंधाराने (त्रिनेत्र प्रकाशन)
हेही पहा : मा.दा.देवकाते यांची[आठवणीतील गाणी]