Jump to content

इंग्लंडचा पहिला विल्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विल्यम पहिला, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)

पहिला विल्यम (इ.स. १०२८ - इ.स. १०८७) हा इंग्लंडचा एक राजा होता. त्याची कारकीर्द १०६६ ते १०८७ होती.

विल्यम इंग्लंडवर राज्य करणारा नॉर्मन वंशाचा पहिला राजा होता. त्याचा जन्म आता फ्रांसचा भाग असलेल्या नॉर्मंडीमध्ये झाला. १०६६ साली इंग्लंडवर हल्ला करून व हेस्टींग्सच्या लढाईत हॅरल्ड गॉडविनसन या इंग्लंडच्या तत्कालीन राजाचा पराभव करून विल्यमने इंग्लंडचे राज्य बळकावले. ही लढाई इंग्लंडच्या इतिहासास कलाटणी देणारी मानली जाते. विल्यमच्या विजयाने इंग्लंडवरचे ॲंग्लो-सॅक्सन वंशाचे राज्य कायमचे संपुष्टात आले. विल्यमच्या विजयाने इंग्लंड देश, इंग्रजी संस्कृती, इंग्रजी स्थापत्य व इंग्रजी भाषा या सर्वांवर कायमचे बदल घडले. विल्यमने स्थापिलेले नॉर्मन इंग्लड जवळजवळ शंभर वर्षे टिकले व शेवटी विल्यमच्या वंशजांमधल्ये तंट्यात बुडाले. प्रशासनासाठी देशा-समाजासंबंधीच्या सखोल आकडेवारीचा उपयोग करणारा पहिला राज्यकर्ता म्हणूनही विल्यम ओळखला जातो. डूम्स डे बुक या त्याने संकलन करून घेतलेल्या अकराव्या शतकातील पुस्तकात तत्कालीन इंग्लडच्या सार्वजनिक व व्यक्तिगत संपत्तीचे सविस्तर आकडे आहेत. विल्यमच्या मृत्यूपश्चात त्याचा मुलगा दुसरा विल्यम इंग्लंडचा राजा झाला.