विरोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विरोली हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांचा पारंपरिक दागिना आहे.तो पायाच्या दुसऱ्या बोटामध्ये घालण्याची सर्वसामान्य प्रथा आहे. जोडवी आणि विरोद्या ही हिंदू स्त्रिया सौभाग्यचिन्हे मानतात. विरोलीचे अनेकवचन विरोल्या. त्यांस, विरवल्या, विरोद्या असेही म्हणतात. हा दागिना चांदीचा असतो. त्याला थोडीफार नक्षीही असू शकते. विरोली ही पायाच्या दुसऱ्या बोटात, जोडवी (जोडवेचे अनेकवचन) तिसऱ्या म्हणजे मधल्या बोटात, करंगळीमध्ये करंगुळ्या व करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये गेंद हा दागिना घालतात. कधीकधी एका बोटात दोन जोडवी घालतात, त्यांतील लहान जोडव्याला खटवे म्हणतात. [१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार". लोकसत्ता (mr-IN मजकूर). 2014-10-03. 2018-03-20 रोजी पाहिले.