Jump to content

वियोगिनी (वृत्त)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वियोगिनी वृत्त या पानावरून पुनर्निर्देशित)

वियोगिनी हे संस्कृत काव्यात वापरले जाणारे एक अक्षरवृत्त आहे. या वृतात लिहिलेल्या विषम क्रमांकाच्या ओळीत १० तर सम क्रमांकाच्या ओळीत ११ अक्षरे आसतात. अक्षरांचे गण पाडल्यावर ते विषम क्रमांकाच्या ओळीचे स स ज ग असे आणि सम क्रमांकाच्या ओळीचे स भ र ल ग असे पडतात.

पंडितराज जगन्‍नाथ या संस्कृत कवीने आपले करुणालहरी हे ६० श्लोकांचे काव्य अंशतः वंशस्थ वृत्तात आणि अंशतः वियोगिनी वृत्तात लिहिले आहे.