विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरात असलेले वैद्यकीय महाविद्यालय होते.

याची स्थापना १८४८मध्ये फीमेल मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया नावाने झाली व १८६७मध्ये त्याचे नाव विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया असे बदलले गेले. १९७०मध्ये येथे पुरुषांनाही प्रवेश मिळाल्यावर याचे नाव द मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया असे ठेवले गेले.

२००३मध्ये हानेमन मेडिकल स्कूल आणि विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया एकत्रित होउन ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनची स्थापना झाली.

भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांनी येथे शिक्षण घेउन एम.डी. ही पदवी मिळविली होती.