विनोदबुवा खोंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विनोदबुवा खोंड

जन्म : मुंबई, १२ डिसेंबर १९६९

ह भ प विनोदबुवा खोंड हे घराण्यातील पिढीजात कीर्तनपरंपरा यशस्वीपणे चालवत आहेत. मूळ गाव उमरेड. जिल्हा नागपूर. वयाच्या पंधराव्या वर्षापासून कीर्तनाला सुरुवात केली. चार पिढ्यांपासून घराण्यात कीर्तनाची परंपरा आहे. वडील वेदमूर्ती दत्तात्रय नारायण खोंड उत्तम वैदिक आणि कीर्तनकार होते त्यामुळे घरातूनच वारसा मिळाला. कीर्तनकार दादाबुवा देवरस गुरू म्हणून लाभले आणि नृसिंहवाडीचे दत्तदासबुवा घाग यांचा परीसस्पर्श लाभला. महाराष्ट्रात आणि बाहेर हजारो कीर्तने केली. विशेषतः ग्वाल्हेर,उज्जैन या हिंदी भाषिक प्रदेशात मिळणारा प्रतिसाद नेहमीच उल्लेखनीय असतो. आई वंदनाताई खोंड संगीत अलंकार असल्यामुळे गायनाचे उत्तम धडे मिळाले. आईचे वडील डी आर निंबर्गीबुवा औंध संस्थानचे गायक अनंत मनोहर जोशी यांचे शिष्य होते. आई वडिलांकडून वेदांचा आणि गायनाचा अभ्यास केल्यावर काशीला दोन वर्षे लक्ष्मीकांत पुराणिक यांच्याकडेही वेदाध्ययन केले आज या क्षेत्रात ३६ वर्षे पूर्ण झाली. विनोदबुवा आपल्या रसाळ कीर्तनांसोबतच परखड विचारांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. विनोदबुवांना महाराष्ट्र शासनाने २०१८-१९चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान केला आहे.


बाह्य दुवे : https://web.archive.org/web/20210219112926/https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201902061501565723.pdf

https://web.archive.org/web/20210219114821/http://www.saamana.com/mumbai-state-culture-award-declare/?fromNewsdog=1

https://web.archive.org/web/20210219115606/https://vivekbuwagokhale.com/view-news/2

https://web.archive.org/web/20210219115115/https://marathi.latestly.com/india/information/maharashtra-government-announced-cultural-award-for-the-year-2018-21115.html