विद्युतघट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विविध विद्युतघट आणि विद्युतसंच: २ AA, १ D, १ हॅम रेडिओचा संच, २ ९-व्होल्टचे संच, २ AAA, १ C, १ कॅमकॉर्डरचा संच, १ कॉर्डलेस फोनचा संच

विद्युतघट म्हणजे रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत रूपांतर करणारे साधन होय. अलेस्सान्ड्रो व्होल्टा यांनी त्याचा शोध इ. स. १८०० मध्ये लावला. जॉन फ्रेडरिक डॅनियल यांनी इ. स. १८३६ मध्ये त्याची सुधारित आवृत्ती डॅनियल सेल तयार केली.