विदीत गुजराथी
| विदीत गुजराती | ||
|---|---|---|
| २०२३ च्या ग्रँड स्विस स्पर्धेमध्ये विदीत | ||
| देश | ||
| जन्म | २४ ऑक्टोबर, १९९२ नाशिक, महाराष्ट्र, भारत | |
| पद | ग्रॅंडमास्टर | |
| फिडे गुणांकन | "२७१५". (क्र. २७) (नोव्हेंबर २०२५) | |
| सर्वोच्च गुणांकन | २७४७ (फेब्रुवारी २०२४) | |
विदीत गुजराती हा बुद्धिबळपटू आहे. तो महाराष्ट्राचा तिसरा, तर भारताचा तिसावा ग्रँडमास्टर आहे.[१] २७०० ची एलो गुणांकन ओलांडणारा तो चौथा भारतीय खेळाडू आहे. तो बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये दुहेरी सुवर्णपदक विजेता आहे. तो आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक विजेता देखील आहे. विदितने २०२३ फिडे ग्रँड स्विस स्पर्धा जिंकले आणि कॅंडिडेट्स स्पर्धेत पात्र ठरणरा तिसरा भारतीय बनला.
तो २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २०२३ ग्रँड स्विस स्पर्धेमध्ये खेळला. तो पहिल्या फेरीत पराभूत झाला, परंतु त्याच्या पुढील १० पैकी ७ खेळ जिंकून त्याने ८½/११ च्या गुणांसह स्पर्धा जिंकली. विदित ग्रँड स्विसच्या पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवून २०२४ च्या कॅंडिडेटस् स्पर्धेसाठी पात्र ठरला.[२]
त्याने २०२४ च्या कॅंडिडेट स्पर्धेमध्ये सहावे स्थान पटकावले, विशेषतः त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये जागतिक क्र. ३ हिकारू नाकामुराचा पराभव केला.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "नाशिकचा विदीत "ग्रँडमास्टर'". सकाळ. 2012-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-02 रोजी पाहिले.
- ^ "FIDE ग्रँड स्विस २०२३ मध्ये शूर विदित गुजराती आणि आर वैशाली यांचा विजय, २०२४ च्या उमेदवारांसाठी पात्रता". chessbase.india. ६ नोव्हेंबर २०२३. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "कॅन्डिडेट २०२४ आर९: विदित गुजरातीने दहा दिवसांत दुसऱ्यांदा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा हिकारू नाकामुराचा पराभव केला". chessbase.india. १५ एप्रिल २०२४. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.