विठ्ठल लहाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

डॉ.विठ्ठलराव लहाने हे महाराष्ट्रतील एक शल्यचिकित्सातज्ञ डॉक्टर आहेत.

दुभंगलेले ओठ व टाळू असणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत

,ते डॉ.तात्याराव लहाने यांचे धाकटे भाऊ आहेत.

दिवसाला 10 ते 13+ सर्जरी करतात.

शाहू college पदवी च्या शेेेेवटच्या वर्षी सर्व विषयात gold medal मिळालेे आहे.


आईचे नाव. अंजनाबाई लहाने वडिलांच नाव. पुंडलिकराव लहाने शिक्षण MBBS,MS,MCS

प्लॅस्टीकसर्जन

छत्रपती शाहू महाराज COLLEGE.लातूर

जन्म:माकेगाव,जि.- लातूर,महाराष्ट्र,भारत

    • मुखपृष्ठ »
    • मुंबई

Sir is one of the greatest creation by god for caring humanity .he is real human in form of Doctor.

दुभंगलेल्या ओठांवर स्मित झळकवणारा ‘लहाने’पॅटर्न![संपादन]

READ IN APP

जन्मलेल्या बाळाचे दुभंगलेले ओठ आणि टाळू पाहून बाळाच्या आईने हंबरडाच फोडला.. आता या मुलाचे कसे होणार, हा प्रश्न आई-वडिलांपुढे निर्माण झाला..[संपादन]

  • admin |संदीप आचार्य, मुंबई |
  • Published on: September 15, 2014 1:35 am

NEXT

आणखी महत्त्वाच्या बातम्या

  • Coronavirus : न्यू यॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुनाचा सल्ला
  • "खरंच, एवढी मोठी रक्कम द्यायचीय का?"; २५ कोटींच्या मदतीवर पत्नीने विचारला प्रश्न, अक्षय कुमार म्हणाला...
  • ठाकरे सरकारचा ७० हजार स्थलांतरित कामगारांना दिलासा, घेतला हा निर्णय

जन्मलेल्या बाळाचे दुभंगलेले ओठ आणि टाळू पाहून बाळाच्या आईने हंबरडाच फोडला.. आता या मुलाचे कसे होणार, हा प्रश्न आई-वडिलांपुढे निर्माण झाला.. कोणीतरी लातूरच्या डॉ. विठ्ठल लहाने यांच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. घरची परिस्थिती बेताची.. ऊसतोडणी करणाऱ्या मजुराचे उत्पन्न ते किती असणार, हिम्मत करून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. खासगी रुग्णालय असूनही शंभर टक्के उपचार मोफत.. डॉक्टरांनी बाळाला तपासले आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर बाळाच्या ओठांवरचे स्मित पाहून त्या मायबापाचे आनंदाश्रू अनावर झाले.. अशा शेकडो आईबापांच्या आशीर्वादाने आपली ‘तिजोरी’ भरत लातूरचे डॉ. विठ्ठल लहाने दुभंगलेल्या ओठांवर हास्य फुलवत आहेत.

समाजातील अनेक नेत्ररुग्णांना आपल्या कौशल्याने नवी दृष्टी मिळवून देणारे डॉ. तात्याराव लहाने यांचे डॉ. विठ्ठल लहाने हे छोटे बंधू. प्लास्टिक सर्जरीमध्ये जे. जे. रुग्णालयातून ‘एमसीएच’ झाल्यानंतर मुंबईतील लीलावती, ब्रिच कॅन्डीपासून अनेक पंचतारांकित रुग्णालयांत तीन वर्षे काम केले, पण चेहऱ्यातील छोटीसी उणीव भरून काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पंचतारांकित रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा दुभंगलेल्या ओठांनिशी आयुष्य घालवणाऱ्या ग्रामीण भागातील गरिबांना आपली खरी गरज आहे, हे डॉ. विठ्ठल लहाने यांनी जाणले आणि लातूरमध्ये जाऊन प्लास्टिक सर्जरीचे काम सुरू केले. याच क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेतील ‘स्माइल ट्रेन’ या संस्थेला शंभराहून अधिक पत्रे लिहून आर्थिक साह्य करण्याची विनंती केली. संस्थेच्या डॉक्टर व अधिकाऱ्यांनी लातूरला येऊन डॉ. लहाने यांच्या कामाची माहिती घेतली आणि जागच्या जागी त्यांच्याबरोबर करार केला. तेव्हापासून म्हणजे २००४ पासून रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे सहा हजार मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत.

आज संपूर्ण महाराष्ट्रात १८२ प्लास्टिक सर्जन असून वर्षांकाठी १५०० ते १६०० सर्जरी दुभंगलेल्या टाळू व ओठांच्या केल्या जातात. यातील ६५० हून अधिक शस्त्रक्रिया एकटे डॉ. लहाने करत असून गेली दहा वर्षे त्यांचे हे काम सुरू आहे. लातूरमध्ये त्यांची दोन रुग्णालये असून सत्तर खाटांच्या या रुग्णालयात दुभंगलेले टाळू अथवा ओठांची कोणतीही शस्त्रक्रिया चाचण्या व तपासण्यांसह मोफत करण्यात येत आहे.

दुभंगलेल्या ओठांची व्यथा

*असे व्यंग घेऊन दरवर्षी दोन हजार मुले महाराष्ट्रात जन्म घेतात. तर देशात ४० हजार मुलांचा जन्म होतो. आज देशभरात पाच लाख मुले शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

*साधारणपणे जन्मल्यानंतर तीन महिन्यांत ओठ दुभंगलेल्या मुलांची शस्त्रक्रिया करणे चांगले, तर टाळू दुभंगलेल्या मुलांची एक वर्षांच्या आत शस्त्रक्रिया करणे योग्य ठरते. वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही तर मुलांच्या बोलण्यावर परिणाम होतो, असे डॉ. लहाने म्हणाले.