विठ्ठलराव नरहर गाडगीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विठ्ठल नरहर गाडगीळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ (जन्म: फेब्रुवारी २५ इ.स. १९२८ - मृत्यू: फेब्रुवारी ६ इ.स. २००१) मराठी राजकारणी आणि काँग्रेसपक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आणि राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होते. प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी (१९६७), संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, राज्यसभा सदस्य १९७१ आणि १९७६; १९७५ ते १९७७ इंदीरा गांधी मंत्रीमंडळात संरक्षण उत्पादन मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय इत्यादी मंत्रालये अशा विवीध जबाबदाऱ्यांसोबत ते मुंबई स्थित विधी महाविद्यालयात मानद प्राध्यापकही होते[१].

कै. न.वि. गाडगीळ ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव. हे पुणे शहरातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून जायचे. राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहिती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते[२].

व्यक्तीगत जीवन[संपादन]

व्यक्तीत्व[संपादन]

त्यांचे वक्तृत्‍व चांगले होते तसेच मिष्कील देखील. महाविद्यालयीन जीवनापासून विश्वासू काँग्रेसकार्यकर्ते होते.

पदे[संपादन]

  • लोकसभेचे सदस्य
  • राज्यसभेचे सदस्य
  • ९ व्या लोकसभेचे सदस्य
  • ७ व्या लोकसभेचे सदस्य
  • ८ व्या लोकसभेचे सदस्य

कारकीर्द[संपादन]

साहित्य[संपादन]

विठ्ठलराव गाडगीळ यांनी विवीध वृत्तपत्रातून वेळोवेळी लेखन केले ते "संसदमार्ग - लोकशाहीचा राजमार्ग" (लेखक: विठ्ठलराव गाडगीळ, प्रकाशकः प्रेस्टीज प्रकाशन) या ग्रंथात संकलीत झाले. ग.प्र. प्रधान यांच्या मतानुसार "लोकशाहीच्या राजमार्गावरील विवीध संघर्षांचे,घटनांचे घटनांमागील विचार प्रवाहांचे वर्णन विवेचन आणि विश्लेषण विट्ठलराव गाडगिळांच्या लेखनातून झाले असून , खासदार आणि मंत्र्यांच्या आधीकार कक्षा आणि मर्यादांचे पैलू गाडगीळांच्या लेखनात येतात परंतु इंदिरा गांधींची कार्यपद्धती आणि आणीबाणी विषयी लेखन करताना ग.प्र. प्रधानांच्या मतानुसार विट्ठालराव गाडगीळांची लेखणी अडखळत असे.[३]

फेब्रुवारी ६ इ.स. २००१ रोजी विठ्ठलरावांचे निधन झाले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Jog, Sanjay (2010-12-26). "Business Standard India".
  2. ^ "🗳️ Gadgil Vitthalrao Narhar, Pune Lok Sabha Elections 1991-92 in India LIVE Results | Latest News, Articles & Statistics". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2020-12-15 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.loksatta.com/daily/20020418/lokpupa.htm सडेतोडराजकीय भूमिकेची सडेतोड मांडणी हा ग.प्र. प्रधान यांचा लोकसत्ता डॉटकॉमवरील लेख दिनांक २५ एप्रील २०१४ रात्रौ ११ वाजता जसा अभ्यासला


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.