विजय खातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विजय रामकृष्ण खातू (इ.स. १९५४ - २६ जुलै, इ.स. २०१७) हे गणपतीच्या मूर्ती बनवणारे मूर्तिकार होते. त्यांनी ४० वर्षांमध्ये गणपतीच्या २५ फुटापर्यंत उंची असलेल्या सुमारे २५० मूर्ती बनवल्या. मुंबईतील परळ भागात रेल्वे वर्कशॉपजवळ त्यांचा मूर्ती तयार करण्याचा कारखाना आहे.

विजय खातू यांचे वडील पोदार कापड गिरणीत सुमारे ३० वर्षे नोकरीला होते. स्वतः विजय खातूंनीही स्वदेशी कापड गिरणीत, ती बंद होईपर्यंत, सुमारे ६ वर्षे काम काम केले.