विजयी मराठा (वृत्तपत्र)
Appearance
विजयी मराठा हा बहुजनाच्या हितासाठी सुरू करण्यात आलेले पत्र होते. त्याची सुरुवात १९१९ला पुणे या ठिकाणी झाली. या वृत्तपत्राचे संपादक श्रीपतराव शिंदे हे होते. या वृत्तपत्रात मराठा व विद्येत मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक, शिक्षण या विषयीसाठी लेखन सुरू होते.ब्राम्हनेतर वृतपत्र होते.
इतिहास
[संपादन]विजयी मराठा पत्र सत्यशोधक चळवळ व इतर पक्ष यांच्या पुरस्कारासाठीच अस्तित्वात आले होते. त्यांच्या संस्थापक-संपादकांची मते त्याबाबत ठाम होती. यामुळेच सुरुवातीपासून त्याचे धोरण निश्चित होते. ५ डिसेंबर रोजी धार येथे मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन होते. तेथे विजयी पत्राचे अंक वाटण्यात आल्याने प्रचाराच्या दृष्टीने त्यांचा खूप उपयोग झाला. पहिल्या अंकाच्या वेळी खंडेराव गणपतराव भालेकर हे सहकारी होते. विजयी मराठा निघाला तेव्हा १९१८ च्या नव्या राजकीय सुधारणांची घोषणा झालेली होती व पुढे १९२० साली नव्या कायद्यानुसार निवडणुका झाल्या. कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या प्रथम पुण्यदिनी विजयी मराठ्यांचा खास अंक काढण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या अंकातील संपादकीयात शाहू महाराजांच्या कार्याचे वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
पहिले अंक
[संपादन]विजयी मराठा या वृत्तपत्राचा पहिला अंक १ डिसेंबर १९१९ पुण्यात प्रकाशित झाला
पहिले संपादक मंडळ
[संपादन]श्रीपतराव शिंदे हे एकटेच संपादक म्हणून आपले कार्य सुरू ठेवले.
संदर्भ
[संपादन]लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४.