विचिटा फॉल्स (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विचिटा नदीवरील धबधबा, ज्यावरून गावास नाव मिळालेले आहे

विचिटा फॉल्स हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. विचिटा काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेले हे शहर आर्चर काउंटी, क्ले काउंटी आणि विचिटा काउंटीमध्ये पसरलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०४,५५३ होती.

येथे शेपर्ड एर फोर्स बेस हा वायुसेना तळ आहे.