विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२२
Appearance
लघुपथ: WP:WAM 2022
(विकिपीडिया:WAM 2022 या पानावरून पुनर्निर्देशित)
काही विषय/संकल्पना
विकिपीडिया आशियाई महिना २०२२ खालील विषयांवर केंद्रित असेल
- शिंटो मंदिर (जपानमधील ही एक अद्वितीय रचना आहे. शिंटो धर्मातील एक किंवा अधिक कामी (देवता) वसवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या इमारतींद्वारे जपानी धर्माबद्दल जाणून घेऊया.)
- आशियातील इस्लाम (जगातील 62% मुस्लिम आशियामध्ये राहतात. इस्लामचे अनेक अनुयायी आशियामध्ये विशेषतः पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियामध्ये इस्लामिक इतिहासाच्या सुरुवातीपासून राहतात. आशियातील इस्लामिक इमारती, स्मारके, इतिहास, व्यक्ती, कला किंवा चालीरीतींबद्दल अधिक जाणून घेऊया!)
- मध्य आशियातील निसर्ग (मध्य आशिया हा उंच मार्ग, पर्वत, विस्तीर्ण वाळवंट, वृक्षविहीन आणि गवताळ मैदानासह विविध भूगोल परिदृश्यांचा प्रदेश आहे. मध्य आशियातील नैसर्गिक सौंदर्य पाहूया.)
- ऑस्ट्रोनेशियन भाषा (ऑस्ट्रोनेशियन भाषा हे 1,257 भाषा असलेले एक मोठे भाषिक कुटुंब आहे, जे कोणत्याही भाषा कुटुंबातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. स्वतः भाषा आणि या भाषांमधील वंशीय गट, लेखक, साहित्यिक आणि दंतकथा यावर संशोधन करा.)
नियम
थोडक्यात: नवीन लेख हा आशिया खंडातील देशांतील विषयांवर (भारत सोडून), चांगल्या दर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट आकाराचा, २०२२च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा; आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.
- हा लेख तुम्ही १ नोव्हेंबर २०२२ (UTC) आणि ३० नोव्हेंबर २०२२ (UTC) दरम्यान स्वतः बनवलेला असला पाहिजे.
- सदर लेख किमान ३००० बाईट आकाराचा आणि किमान ३०० शब्दांचा असावा. (महितीचौकट, साचे सोडून)
- सदर लेखाला उचित संदर्भ असावेत व त्यांची सत्यता स्पष्ट असावी.
- लेखातील भाषा शुद्ध असली पाहिजे, अर्थात लेख पुर्णतः मशीनद्वारे रूपांतरित केलेला नसावा.
- कॉपीराईट उल्लंघन किंवा उल्लेखनियता यासारख्या प्रमुख समस्या लेखात नसाव्यात. (उल्लेखनियता स्पष्ट असावी)
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा असला पाहिजे.
- सदर लेख मराठी भाषेत लिहिलेला असावा पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांतील विषयांवर असावा.
- स्पर्धा आयोजित करणाऱ्या लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
- स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे मराठी भाषेतील परीक्षक निर्धारित करतील.
- जेव्हा आपले वरील निकष पूर्ण करणारे किमान ४ लेख स्वीकारले जातील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकाकडून डिजीटल बार्नस्टार देण्यात येईल.
- तुम्ही 'विकिपीडिया आशियाई दूत' घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल.
या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा.
संदर्भ दुवे
आयोजक/ परीक्षक
साइन अप
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करा (साइन अप करा) आणि तुमचे योगदान द्या.
लेख सादर करा
तुम्ही लेख तयार केल्यानंतर खाली लिंक असलेल्या फाउंटन टूलद्वारे लेख सबमिट करावे.