प्रथमपुरूषी मी-आम्ही-आपले-आपण, द्वितीय पुरूषी तू-तुम्ही-आपण-तुमचे इत्यादी सर्वनामे आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी वाक्यरचना लेखांच्या पानातून असू नयेत.(सदस्य चर्चा पानावर इतर संकेतांच्या अधीन राहून प्रथमपुरूषी आणि द्वितीयपुरूषी रचना करण्यास हरकत नाही.)
लेखन अलंकारिक नसावे आणि विशेषणे, व्यक्तिगत तर्क/मते, कथाकथने, वर्णने, वार्तांकने वा स्तुती-प्रौढी,सल्ले विरहित असावे.