विकिपीडिया:सजगता/19
Appearance
विकिपीडियाचा एक उद्देश इथे जमा झालेले ज्ञान आणि माहिती कोणत्याही व्यक्तींस/संस्थेस, इतर विविध माध्यमांतून सहज पुनर्वितरित करता यावे, आणि ते कोणत्या न कोणत्या मार्गाने समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावे असा आहे; अर्थात हे उद्दिष्ट साध्य व्हायचे असेल तर अशा व्यक्ती व संस्थांना येथे आलेली माहिती खरेच प्रताधिकार-मुक्त स्रोतातून आली आहे याची खात्री वाटावयास हवी आणि त्या संदर्भातल्या नियम-संकेतांचे आपल्या हातून स्वतःहून पालन केले जाईल, याबद्दल विकिपीडियावरील प्रत्येक लेखक-संपादकाने, तसेच छायाचित्रे चढवणार्यांनी संवेदनशील रहावयास हवे.