विकिपीडिया:सजगता/112

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानाची गरज आणि भूक भागवण्यासाठी, ज्ञानकोश संबधित विषय तसेच ज्ञानशाखेसंदर्भात संकलित माहितीच्या आधारावर अधिक सखोल विस्तृत पार्श्वभूमी उपलब्ध करण्याचे काम करतात. बहुतांश ज्ञानकोश सचित्र असतात. माहितीसाठी नकाशांचे, पुस्तकांचे आणि सांख्यिकीचे आधार दिलेले असतात. सामान्यत: सुशिक्षित, माहिती-विषेशज्ञ आणि तज्ज्ञांच्या संशोधनाने आणि मार्गदर्शनाखाली ज्ञानकोशांची निर्मिती होत असते.