विकिपीडिया:संरक्षण धोरण
Appearance
(विकिपीडिया:संरक्षण नीती या पानावरून पुनर्निर्देशित)
हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे. हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. |
कोणालाही संपादन करता येणे हे विकिपीडियाच्या मूळ तत्त्वांपैकी एक आहे. म्हणूनच येथील बव्हंश पाने कोणालाही संपादित करता येतात. याद्वारे ते असलेल्या माहितीत भर घालू शकतात किंवा त्यातील त्रुटी योग्य प्रकारे काढू शकतात. असे असताही काही विशिष्ट परिस्थितींमध्ये (उत्पात, नासाडी, इ.) विकिपीडियावरील पानांना अनिर्बंध संपादनांपासून नुकसान होण्याची शक्यता अशते. अशा वेळी अशा पानांना (अनेकदा तात्पुरते आणि काही वेळा अनंत काळासाठी) अशा संपादनांपासून सुरक्षित केले जाते.
पूर्ण-सुरक्षित | |
अर्ध-सुरक्षित | |
अपलोड-सुरक्षित | |
कॅस्केड-सुरक्षित |
सध्या मराठी विकिपीडियामध्ये 5 संरक्षण स्तर आहेत.
- असुरक्षित
- अर्ध-सुरक्षित
- संपूर्ण-सुरक्षित
- अपलोड-सुरक्षित
- कॅस्केड-सुरक्षित
असुरक्षित
अर्ध-सुरक्षित
संपूर्ण-सुरक्षित
अपलोड-सुरक्षित
कॅस्केड-सुरक्षित
कॅसकेडिंग संरक्षणाचा वापर विशेषतः दृश्यमान पृष्ठ जसे की मुखपृष्ठ आणि काही अत्यंत वापरले जाणारे साचे यांना विध्वंसापासून रोखण्यासाठी केला जातो.