विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आकडेवारी आणि आरंभबिंदू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
परिमाण आरंभबिंदू समारोप
लेखसंख्या ३२,६७९ ३२,७२७
एकूण पाने ८४,३८५ ८४,५२०
एकूण संपादने ७,०२,००० ७,०३,४६९
आशयघनता २०.८२६४७ २०.८४५६३९
नोंदणीकृत सदस्य १५,०५५ १५,१००
गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य १४० १४१
सगळ्यात लहान १०% लेखांचा आकार १७४ १७४
सगळ्यात मोठ्या १०% लेखांचा आकार ५,५६४ ५,५६०

आकडेवारीतील फरक आणि विश्लेषण[संपादन]

  • लेखसंख्या - ४८
दिवसाला २४ पाने. मराठी विकिपीडियाच्या सुरुवातीपासूनची सरासरी - अंदाजे ११ पाने प्रतिदिन
  • एकूण पाने - १३५
प्रतिलेख १.८१ supporting पाने
  • एकूण संपादने - १,४६९
७३४.५ प्रतिदिन. एप्रिल १६, २००९पासूनची सरासरी - जवळपास ५०० संपादने
  • आशयघनता - +०.०१९१६९
लेखसंख्या सरासरीच्या दुप्पट वेगाने वाढली असली तरीही आशयघनता कमी झाली नाही. हे चांगले लक्षण आहे.
  • नोंदणीकृत सदस्य - ४५
यात इतर विकिपीडियावर नोंदणी करणारे सदस्यही शामिल असले तरी गेल्या दोन दिवसांत व त्याआधीच्या काळातही अनेक नवीन सदस्य मिळाले व त्यांचे योगदानही सुरू झाले.
  • गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य - +१
  • सगळ्यात लहान १०% लेखांचा आकार - ० बाइट
येथील मोठ्या प्रमाणावर लेख अगदी छोट्या स्वरुपात पडून असल्यामुळे हा आकडा हलला नाही.
  • सगळ्यात मोठ्या १०% लेखांचा आकार - -४ बाइट
एकूण लेखसंख्या वाढल्यामुळे या १०% लेखांत मोडणारे लेख वाढले, त्यामुळे आकारमान कमी झाले.

एकूण आढावा घेतला असता संपादनेथॉन दोन प्रकारे सफल झाली --

१. सरासरीपेक्षा जास्त वेगाने लेखसंख्या व संपादने करण्यात आली तसेच आशयघनता कमी झाली नाही.

२. येथून पुढे मराठी विकिपीडियाच्या वाढीचा वेग काय असेल याबद्दल सर्वेक्षणात्मक पुरावा (anecdotal evidence) मिळाला त्याने अपेक्षा काय असाव्या याबद्दल अधिक माहिती मिळाली.

अपेक्षा[संपादन]

वर दिलेल्या आकडेवारीवरून येथे पुढील एक वर्षासाठी काही अपेक्षा व उद्दिष्ट खाली मांडत आहे. यावर चर्चा करुन बदल करुयात.

  • लेखसंख्या - २४*३६५ = ८,७६० ~९,०००
एक वर्षांती संख्या - ३२,७२७ + ९,००० ~ ४२,०००
  • एकूण पाने - ६७.५*३६५ = २४,६३८ ~२५,०००
एक वर्षांती संख्या - ८४,५२० + २५,००० ~ १,१०,०००
  • एकूण संपादने - ७३५*३६५ = २,६८,०९३ ~२,७०,०००
एक वर्षांती संख्या - ७,०३,४६९ + २,७०,००० ~ ९,७५,००० (१०,००,०००?)
  • आशयघनता - +०.००९५८५*३६५ = ३.५० ~४
एक वर्षांती संख्या - २०.८४५६३९ + ४ ~ २५
हा आकडा लेखसंख्या, संपादने आणि एकूण पाने यांवर आधारित असल्यामुळे उद्दिष्टाला फारसा अर्थ नाही. जर ही तीन उद्दिष्टे गाठली तर आशयघनतेचे उद्दिष्ट सहज पार पडेल.
  • गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य - २००
  • सगळ्यात लहान १०% लेखांचा आकार - २००
  • सगळ्यात मोठ्या १०% लेखांचा आकार - ६,१४४ (६ किलोबाइट)
वरील अपेक्षांवर चर्चा पानावर तुमचे मत द्या.