विकिपीडिया:विशेष सजगता/13

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • मराठी भाषिकांना मराठीतून अद्ययावत स्वरूपातील ज्ञानकोश उपलब्ध करून देण्याचे मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून होत असलेले सामूहीक कार्य मराठी भाषा आणि भाषिकांच्या एकुण उत्कर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे हे आपण सर्वजण जाणतोच.
एखादी कृती/विचार/मुद्दा यांबद्दल आपले मत निराळे असू शकते.विकिपीडियातील लेखाचा आवाका, त्याची निष्पक्षता आणि खोली चर्चापानांवरून सर्व बाजू लक्षात घेऊन होणाऱ्या चर्चेवर अवलंबून असते. त्यामुळे आपली मतांतरे मराठी विकिपीडियाच्या निष्पक्षतेच्या आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने बहुमुल्य असणार आहेत.आपापली मतांतरे संबधीत लेखाच्या चर्चा पानावर अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहीत मांडावीत.
एवढे करूनही आपले एखादे मत मराठी विकिपीडियन समुदायाकडून स्विकारले गेले नाही असेही होऊ शकते.एकुण मराठी भाषेचे हित लक्षात घेऊन प्रसंगी आपल्या व्यक्तिगत मतांना मुरड घालून संयमाचा परिचय द्यावा. एखाद्या लेखा संदर्भाने असलेला राग दुसऱ्या लेखावर अथवा चर्चेतील वेगळी मते मांडण्याऱ्या व्यक्तींवर व्यक्तीश: काढणे टाळावे.
लेखन-योगदान करण्यासाठी, आपली मते प्रतिपादण्यासाठी किंवा आपली बाजू पणास लावण्यासाठी आंतरजालावर मराठी विकिपीडिया हेच एकमेव किंवा अंतिम स्थान नाही. विकिपीडियाच्या विविध भाषांतील बंधुप्रकल्पांवर, मराठी भाषेतील इतर ज्ञानकोशांवर, तसेच प्रसंगी इतर मराठी संकेतस्थळांवर लेखनाच्या अनेक संधी आपणास उपलब्ध असतात. या संधींचा उपयोग करण्याचाही विचार करावा. मराठी विकिपिडियावरील चर्चांमध्ये आपली मतांतरे मांडण्याचा प्रयत्न हतोत्साह न होता सभ्यतेच्या मर्यादांशी बांधील राहून कायम चालू ठेवावा. मराठी विकिपीडियाच्या विश्वासार्हतेकरिता निष्पक्षता आवश्यक आहे आणि निष्पक्षतेकरिता वेगवेगळ्या दृष्टिकोनांचे प्रकटीकरण आणि आकलन आवशयक असतेच.