Jump to content

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चावडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुस्वागतम्

सुस्वागतम् !!! मराठी रंगभूमीच्या विकिमोहिमेवर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडियावर मराठी रंगभूमीशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
विकिप्रकल्प मराठी रंगभूमी

नमस्कार मंडळी, अमोल पालेकर यांनी मराठी नाटक आणि सबंधित कोणतेही लिखाण विकिपिडीयावर नाही असे भाषणात जाहीर करून सर्व पत्रकार मंडळींना "बातमी" दिली आहे. या संदर्भात अमोल पालेकर यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी बरीच माहिती मराठी विकिपीडियासाठी मिळवून देवू असे भरीव आश्वासन दिले आहे. मराठी रंगभूमी इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णू अमृत भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीकरांच्या प्रेरणेने केला. हा 150 वर्षाचा रंजक इतिहास मराठी विकिपीडिया वर आणायच्या निमित्ताने विकिप्रकल्प: मराठी रंगभूमी सुरू करावा अशी कल्पना येथे मांडायची आहे. या प्रकल्पात मध्ये अनेक जण आपल्या परीने काम करू शकतील. यात करायच्या ढोबळ गोष्टी येथे नमूद करीत आहे -

  1. मराठी रंगभूमी, मराठी रंगभूमीचा इतिहास, मराठी रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, समांतर रंगभूमी, अनेक रंगकर्मी अशा अनेकविध विषय तयार करून त्यावर मराठी विपी वर विपुल लिखाण करता येईल.
  2. विविध नवीन साचे आणि वर्ग बनवायला लागतील.
  3. विविध लायब्ररी मधील पुस्तके धुंडाळून त्यातील योग्य मजकूर संदर्भ सहित आंत येईल.
  4. माजी नाट्य संमेलनांची संपूर्ण माहिती आणि फोटो मिळवून ते लेखात चढवणे
  5. नाट्य परिषद आणि अनेक संस्थांकडून मिळालेली माहिती सुसूत्र पाने मराठी विकिपीडिया टाकणे
  6. मराठी रंगभूमीवर योगदान देणार्‍या व्यक्तींचे लेख बनवणे
  7. हा प्रकल्प पुढच्या नाट्य संमेलनापर्यंत पूर्ण करून त्याची माहिती सुयोग्य पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवणे.

आपल्या सर्वांच्या सहाय्याने हा प्रकल्प पुढे नेता येईल... मंदार कुलकर्णी (चर्चा)