Jump to content

विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई/असलेले लेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंबाजोगाई हे एक नगरपालिका,तहसील व उपविभागीय क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यातील,औरंगाबाद विभागातील,बीड जिल्ह्यातील तालुक्याचे स्थान आहे. १९०३ मध्ये या शहराचे नाव बदलून मोमिनाबाद ठेवण्यात आले होते. १९६२ मध्ये परत अंबाजोगाई असे नाव करण्यात आले. बालाघाटच्या डोंगररांगात वसलेले हे शहर समुद्र सपाटी पासून ६३३.०० मीटरवर ( २०७६ फुट ) असून येथील वातावरण आरोग्यासाठी हितकारक आहे. ऐतिहासिक वारसा लाभेलेले हे शहर मराठवाड्याचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. ग्रामदेवता अंबाबाई म्हणजेच योगेश्वरी नावामुळे याला अंबाजोगाई असे नाव पडले.योगेश्वरी देवी कोकणातील चित्पावनांची कुलदेवता. शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या जयवंती नदीने गावाचे दोन भागात विभाजन केले.जयवंती नदीचा उगम शहराच्या दक्षिणेला असणाऱ्या भीमकुंड तीर्थातून होतो ती पुढे जाऊन बाणगंगेला मुकुंदराज स्वामीच्या समाधीच्या पुढे मिळते.

या शहराला मंदिरांचा खूप मोठा वारसा आहे. योगेश्वरी देवीच्या मंदिरांच्या सोबत इथे अनेक हेमाडपंथी मंदिरे आहेत.खोलेश्वर,मध्यवर्ती गणेश मंदिर,आमलेश्वर,सकलेश्वर (बारा खांबी मंदिर),काशी विश्वनाथ,विमनाथ जैन मंदिर,समर्थ रामदास प्रेरित दोन राम मंदिर मुकुंदराज स्वामी समाधी,दासोपंतांची दोन दत्त मंदिर व दासोपंत स्वामींची समाधी,शंभूलिंग शिवाचार्य मठ.अंबाजोगाईचे मराठवाड्यातील एक शैक्षणिक केंद्र म्हणून १९१८ नावा रूपास यायला सुरवात झाले.