Jump to content

विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. १५ जानेवारी २०१९ रोजी संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे सुशान्त देवळेकर आणि माधवी नाईक उपस्थित होते.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१९ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था

[संपादन]
  • राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा विभाग, मुंबई विद्यापीठ

प्रशिक्षण मुद्दे

[संपादन]
  1. मराठी टंकलेखनाचा सराव
  2. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. मुक्त ज्ञानव्यवहाराचे महत्त्व
  5. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे, नवा लेख लिहिणे
  6. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

[संपादन]
  • मंगळवार दि. १५ जानेवारी २०१९
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी ११:३० ते ३.००

सहभागी सदस्य

[संपादन]