विकिपीडिया:ओळख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर "संपादन" दिसतेय का? विकिपीडीआवर तुम्ही हा लेख लगेच संपादू शकता, अगदी प्रवेश न करतासुद्धा.

विकिपीडिआ काय आहे?

संपादन दुव्यावर टिचकी देऊन लेखात बदल करा

विकिपीडिआ हा विकिपीडीआच्या वाचकांतर्फे सहकारी तत्वावर लिहिला जाणारा ज्ञानकोश आहे. अनेक लोक अविरतपणे विकिपीडिआ सुधारण्यास हात्भार लावत आहेत. अलिकडील बदल या पृष्ठावर तुम्हाला अलिकडे लोकांनी केलेले बदल दिसुन येतील. अयोग्य बदल लगेचच काढून टाकले जातात.

मी कशी मदत करू शकतो?

लेख संपादताना आजिबात भीती बाळगू नकाकोणीही संपादन करू शकते(शकतो)., कृपया अशी गोष्ट शोधा ज्यात तुम्ही सुधार करू शकता आणि त्यात सुधार करा. मग तो लेख असो, लेखाचा साचा असो किंवा व्याकरण असो.

तुम्ही केलेल्या बदलाने विकिपीडिआचे नुकसान होणार नाही कारण प्रत्येक गोष्ट नंतर दुरूस्त करता येते. तर मग करा सुरूवात आणि विकिपीडिआला समृद्ध माहितीकोश बनवण्यास मदत करा.

तुमचे पहिले संपादन करा!

विकीपीडिआमध्ये लेखांची भर टाकण्यासाठी किंवा संपादनासाठी सदस्यत्व जरी आवश्यक नसले तरी विकिपीडिआसाठी ते महत्वाचे ठरते. सदस्य झाल्यानंतर विचारांची देवाणघेवाण आणि त्यानंतर केल्या जाणारे लेखांचे संपादन अधिक व्यापक आणि परिणामकारक होते. तेव्हा विकिपीडिआला अधिक प्रगल्भ बनविण्यासाठी सदस्य म्हणून नोंदणी करण्याचे सर्व वाचकांना येथे आवाहन केले जात आहे.

  1. 'संपादन' या दुव्यावर टिचकी द्या.
  2. त्यानंतर पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित पाठ्य लिहावे किंवा बदलावे
  3. बदल साठविण्यापूर्वी show preview वापरून बदल तपासून पहा.
  4. आणि खात्री झाल्यानंतर बदल साठविण्यासाठी save page कळेवर टिचकी द्यावी. (शुद्धलेखनासंबंधीच्या आणि तत्सम छोट्या चुका सुधारल्यानंतर minor edit ला टिचकी देऊन बदल साठवावे. यामुळे विकिपीडिआला आपल्या लेखांमधील बदल साठविण्यासाठी कमी जागा लागते).

कसोटी बदल

,