विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/३ एप्रिल २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प (Thermal power plant) या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर करुन पाण्याची उच्चदाबा वर वाफ बनवली जाते. व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो. अश्या प्रकारे वीजनिर्मिती करता येते. औष्णिक वीजनिर्मितीचे प्रकल्पाचे मुख्य तत्व थर्मोडायनामिक्समधील रँन्काईन चे चक्र (Rankine cycle) आहे. या चक्रानुसार वाफ उच्च दाबावरुन कमी दाबावर आणल्यास वाफेतील उर्जेचे परिवर्तन उपयुक्त कार्यात होते. इथे वाफेचा उपयोग जनित्राचे चक्र फिरवण्यासाठी होतो. कमी दाबावरची वाफ उष्ण असली तरी तीची उर्जा कमी झालेली असते. ही थंड वाफ पुन्हा उच्च दाबावर न्यावयाची झाल्यास तिला पहिले थंड करुन त्याचे पाणी करावे लागते व ह्या पाण्याला पुन्हा उष्णता देउन उच्च दाबाची करावी लागते. हे रॅन्काईनच्या चक्राचे तत्व आहे. रँकाईन च्या चक्रावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता साधारणपणे ३० ते ५० टक्यांपर्यंत असते. म्हणजे वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेल्या झालेली उर्जा इंधन जाळून तयार होणार्‍या उर्जेच्या ३० ते ५० टक्के असते. ही कार्यक्षमता वाढवणे हे आधुनिक विज्ञानाला असलेले चँले़ज आहे. (पुढे वाचा...)