Jump to content

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२ ऑक्टोबर २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एच.ए.एल. तेजस (रोमन लिपी: HAL Tejas) हे हलक्या वजनाच्या लढाऊ विमानवर्गातील अर्थात लाइट काँबॅट एरक्राफ (एल.सी.ए.) वर्गातील संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. इ.स. १९८३ साली एल.सी.ए. हा कार्यक्रम भारतीय शासनातर्फे हाती घेण्यात आला. मे इ.स. १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीबाबत भारतावर बंदी आणण्यात आली. त्यामुळे या विमानाचे सर्व भाग भारतात बनविणे भाग पडले. तसेच, भारताला यापूर्वी असे आधुनिक विमान बनविण्याचा अनुभव नव्हता. यामुळे एल.सी.ए. पूर्ण होण्यात उशीर झाला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाचे तेजस असे नामकरण केले. सध्या या विमानांची भारतीय नौदलासाठी निर्मिती होत आहे. (पुढे वाचा...)