विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२० मार्च २०१०
Appearance
घोणस (शास्त्रीय नाव : Daboia, उच्चार: डाबोया) हा आशिया खंडातील भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, दक्षिण चीन, तैवान या भूप्रदेशांमध्ये आढळणारा विषारी साप आहे. हा महाराष्ट्रामधील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे. घोणसाचे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणार्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. (पुढे वाचा...)