विकिपीडिया:प्रचालक/मार्गदर्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील मुद्दे मार्गदर्शनासाठी आहेत, हे धोरण किंवा नियम नाहीत.

प्रचालकांची काही कामे[संपादन]

  • पानांची सुरक्षा-पातळी: एखाद्या पानावर उत्पात होत असेल, आणि जर उत्पात एकाच खात्यातून, किंवा IP address वरून होत असेल, तर केवळ तेच ब्लॉक करावेत. IP address डायनॅमिक असेल, तर IP range ब्लॉक करावी. IP address, व IP range हे नेहमीच मर्यादित काळापुरते ब्लॉक करावेत. पानाची सुरक्षा पातळी वाढवणे हा शेवटचा पर्याय असावा.
  • पाने हटवणे (delete करणे):
  • पान काढा विनंती: एखाद्या पानावर "पान काढा" विनंती असेल तर कारण आणि पान बघून सुज्ञ बुद्धीने विनंती स्वीकारण्यात किंवा नाकारण्यात यावी.
  • पान काढा साचा लावणे: ज्या लेखांची उल्लेखनीयता संशयास्पद आहे, असे लेख थेट हटवू नये. अशा लेखांवर "पान काढा" विनंती टाकावी. इतर प्रचालक ती विनंती बघून (वरीलप्रमाणे) योग्य तो निर्णय घेतील.
ह्यामुळे ह्यामुळे प्रचालकांची मक्तेदारी/मनमानी होणार नाही. तसेच, लेखांची उल्लेखनीयता संशयास्पद असल्यास दोन व्यक्तींचे एकमत झाल्यावरच तो लेख हटवल्या जाईल.
  • स्वतः पान काढणे: ज्या पानांवर किंवा लेखांवर व्यक्तिगत हल्ले, शिवीगाळ, किंवा स्पष्टपणे जाहिरातबाजीचा मजकूर आहे अशी पाने थेट काढण्यास हरकत नाही.
  • संस्करण वगळणे: विकिपीडियाच्या लेखांमध्ये, किंवा इतर कोणत्याही नामविश्वात संपादकांची खाजगी माहिती, किंवा संपर्क माहिती शक्यतो नसावी. अशी माहिती आढळल्यास पूर्ण पान हटवण्याऐवजी केवळ केवळ त्या संपादनाचा इतिहास/संस्करण हटवण्यात यावे (इंग्रजी: revision deletion - रिविजन डिलिशन).
इतर विकिपीडियाप्रमाणे मराठी विकिपीडियावरसुद्धा सर्च इंजिनचे वेब क्रॉवलर (इंग्रजी विकिपीडिया: web crawler) अवितरितपणे माहिती गोळा करत असतात. त्याचप्रमाणे खाजगी वेब क्रॉवलर सुद्धा सक्रिय असतात. त्यांना संपर्क माहिती मिळाली असता अवांछित/अनपेक्षित संपर्क होण्याची खूप दाट शक्यता असते (जाहिरातबाजीचे तसेच धोकाधडी-फसवेगिरी करणारे फोन, email, व इतर माध्यमे).
  • सदस्यांना प्रतिबंधित करणे