वा.ना. उत्पात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत. ते पंढरपूरचे राहणारे आहेत.

श्री वा. ना. उत्पात हे गेली ३३ वर्ष पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुर्मासात भागवत सांगत आहेत . श्रीमदभागवताचा हा अखंड ज्ञानयज्ञ ३३ वर्षे अविरतपणे त्यांच्या हातून सुरू आहे. तसेच चातुर्मासात त्यांची ज्ञानेश्वरी प्रवचने देखील अनेक वर्षे सुरु होती.   

ते रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी आहेत.       

    39 वर्षे त्यांनी

*कवठेकर प्रशाला पंढरपूर* येथे संस्कृत,मराठी,इंग्रजी, इतिहास या विषयाचे अध्यापन केले.त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्त झाल्यावर  संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत,रुक्मिणी स्वयंवर,ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह,प्रवचने केली. विविध विषयांवर व्याख्याने देतात.

                    पंढरपुरातील समाजकारण,राजकारण या मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे .ते 25 वर्षे नगरसेवक आणि 2 वर्षे नगराध्यक्ष होते.

          त्यांचे गुरुवर्य श्री वरदानंदभारती म्हणजेच प.पू अनंतरावजी आठवले यांच्या सहवासाने आणि आणि आशीर्वादाने त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात खूप प्रगती केली. गीता,उपनिषदे,संस्कृत वाङमय,इतिहास व सावरकर वाङ्गमय याचे  ते गाढे अभ्यासक आहेत .सावरकर हा त्यांचा श्वास आहे पंढरपूर येथे  सावरकरांचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा *1 लाख* पुस्तकांचे सावरकर वाचनालय आणि दीड कोटी रु खर्च करून *सावरकर क्रांती मंदिर* त्यांनी उभे केले आहे.आणि त्यासाठी लागणारी सर्व रक्कम ही त्यांनी देणग्या आणि स्वतः च्या कीर्तन प्रवचन आणि व्याख्यानातून जमवले आहेत .क्रांती मंदिराचे काम अजून चालू आहे त्यानी आत्तापर्यंत 25 पुस्तके लिहिली आहेत आणि शेकडो लेख लिहिले आहेत.अजून ८१व्या वर्षीही त्यांचे लिखाण अविरतपणे सुरू आहे .ते प्रखर हिंदुत्ववादी आहेत.

           त्यांना आत्ता पर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यातील काही म्हणजे *'देवर्षी नारद पुरस्कार,'* *'महर्षी याज्ञवल्क्य* *पुरस्कार','आदर्श शिक्षक* पुरस्कार, अलिकडेच मिळालेले *'नानासाहेब पेशवे* *पुरस्कार' लावणीचा रामजोशी पुरस्कार* व *सावरकर प्रतिष्ठान पुणे यांचा जीवनगौरव पुरस्कार* अशा शेकडो पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

     *

पुस्तके[संपादन]

  • कलंक मतिचा झडो (आर्य मूळ भारतातले नव्हतेच, ते बाहेरून आले; मेकॉलेने इंग्रजी शिक्षण देऊन भारतीय संस्कृती नष्ट करायचा प्रयत्न केला, वगैरे समजुतींचे खंडण कराणारे पुस्तक)
  • चला हिंदूंनो, जागृत व्हा रे ...!
  • मनुस्मृती आहे तरी काय ?
  • सावरकर - एक धगधगते *भागवताचार्य वा ना उत्पात यांची ग्रंथसंपदा* १)ऐश्वर्या संपन्न रुक्मिणी स्वयंवर २)रुक्मिणी स्वयंवर कथा ३)रुक्मिणी पत्रिका ४)रुक्मिणीस्वयंवर संस्कृत सार्थ ५)श्री रुक्मिणी उपासना पूजा विधि तोत्रे आरत्या सहस्त्रनाम ६)श्री विठ्ठल-रुक्मिणी नित्य उपासना ७)श्री विठ्ठल उपासना पूजाविधी स्तोत्रे सहस्त्रनाम सण-उत्सव ८)संत नामदेवांचे पसायदान ९)संत तुकारामांचे पसायदान १०)देवी सती अहल्या ११)आस्वाद सुभाषितांचा भाग१ १२)आस्वाद सुभाषितांचाभाग२ १३)आस्वाद सुभाषितांचा भाग३ १४)मातृ महिमा १५)सावरकर एक धगधगते यज्ञकुंड १६)सावरकर आक्षेप व खंडन १७)आस्वाद सावरकर कवितांचा १८)अशी गरजली वीर वाणी १९)मनुस्मृति आहे तरी काय ? २०)गर्व से कहो हम ब्राह्मण है २१)कलंक मतीचा झडो २२)सर्व सवे हरी (प पू अ दा आठवले यांची संस्कृत स्तोत्रे)सार्थ

पुरस्कार[संपादन]

  • डोंबिवलीच्या सावरकर अभ्यास मंडळाचा वीर सावरकर सेवा पुरस्कार (इ.स. २००४)