वाहतुकीचे सर्वसाधारण नियम
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
शिकाऊ लायसन्स करिता वाहतुकीचे सर्वसाधारण नियम
कलम ११२: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.
कलम ११३: भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये.
कलम ११९: वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये.
कलम १२१: वाहन चालविताना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा.
कलम १२२: वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेऊ नये.
कलम १२३: वाहनाच्या बाहेरील भागावर बसून प्रवाशांची वाहतूक करू नये.
कलम १२५: चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी किंवा एखादी वस्तू ठेऊ नये.
कलम १२६: योग्य ती काळजी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करू नये.
कलम १२८: शिरस्त्राण परिधान न करता वाहन चालवू नये.(राज्य व राष्ट्रीय महामार्गावर)
कलम १३०: रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची संबंधित सर्व प्रमाणपत्रे सादर करणे.
कलम १३२: गणवेशधारी अधिकाऱ्याने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन थांबविणे.
कलम १३४: अपघात घडल्यानंतर संबंधित महिती २४ तासांच्या आत पोलिसांना कळविणे व अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करणे.
कलम १८५: दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये.
कलम १८६: मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये.
म.मो.वा.नि. २५० अ: वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करू नये.