वातव्याधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वातव्याधी म्हणजे वातदोषाच्या असंतुलनामुळे होणारे व्याधी होय.[१]

लक्षणे[संपादन]

  • हाता-पायाची बोटे आखडतात, हात बंद-उघड होऊ शकत नाहीत.
  • हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, बोटांमध्ये तीव्र वेदना होतात.
  • अंगावर अकारण काटा येतो.
  • अकारण बडबड केली जाते.
  • पाय, पाठ व डोके आखडते.
  • पाठीला कुबड येते.
  • मनुष्य चालण्यास असमर्थ होतो.
  • अंगावर सूज येते.
  • झोप कमी येते.
  • गर्भधारणा होण्यास त्रास होतो किंवा झालेली गर्भधारणा टिकत नाही.
  • पुरुषांमध्ये पुनरुत्पादनाची शक्‍ती कमी होते.
  • स्त्रीमध्ये रजःप्रवृत्ती कमी किंवा अकाली थांबते.
  • संपूर्ण शरीरात किंवा शरीराच्या एका भागात कंप होऊ लागतो, तसेच बधिरपणा येतो.
  • मान ताठ राहत नाही, डोक्‍यात तीव्र वेदना होतात.
  • गंधज्ञानाची क्षमता कमी वा नष्ट होते.
  • डोळे बारीक होतात, छाती-मानेतही जखडल्यासारखे वाटते.
  • सर्व अंगात वेदना होतात, अस्वस्थता प्रतीत होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ वातव्याधीचे निदान Archived 2012-03-13 at the Wayback Machine. डॉ. श्री बालाजी तांबे, सकाळ