वाठोडा शुक्लेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाठोडा शुक्लेश्वर हे शहर अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील आहे. शहर अमरावती-दर्यापूर मार्गावर वाठोडा स्टॉप वरून उत्तरेस 4 किमी. आहे. वाठोडा हे पूर्णा नदीच्या काठावर वसलेले शहर असुन येथील ग्रामपंचायत या जिल्ह्यातील तिसरी सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. 17 सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या या शहराची लोकसंख्या अंदाजे 18,000 आहे. शहरात सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध आहे,शहरातील अरुंद रस्ते शहराला सुशोभित करतानी दिसून येते. येथील ग्रामपंचायत कडून शहरात २ उद्यान(ब्लु-डायमंड) उभारण्यात आलेले आहे.शहराला लागून असलेल्या खेडे-गावांसाठी वाठोडा हीच मुख्य बाजारपेठ आहे.दाट लोकवस्ती असलेले बाजारपेठ शहरातील मुख्य चौक आहे आणि आणखी एक मुख्य चौक तो म्हणजे बस स्टॉप जिथे दिवस भर नागरिकांची वर्दळ बघायला मिळते.

शहरात असलेल्या शुक्लेश्वर मंदिराच्या नावावरून या शहराला वाठोडा शुक्लेश्वर नाव पडले असावे. शासनाकडून शुकलेश्वर मंदिरास "ब" वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे. शहरातील हे मंदिर विदर्भाची काशी म्हणुन सुद्धा ओळखल्या जाते कारण या मंदिरामध्ये प्राचिन कालीन साडे अकरा ज्योतिर्लिंग आहेत.