वसुमती धुरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसुमती रवींद्र धुरू या पाकशास्त्रावर मराठी पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्राची पदवी आणि आहारशास्त्रातील पदविका मिळवली. आहारशास्त्र परिक्षेत त्या पहिल्या वर्गात द्वितीय क्रमांकावर होत्या. धुरू यांनी मुंबईतील शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हाॅस्पिटल, सी.एम.सी. हाॅस्पिटल्स (लुधियाना-पंजाब) व अल्टमान हाॅस्पिटल (ओहायो-अमेरिका) यथे डायटेशियन म्हणून काम केले आहे. न्युट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन वीमेन सायंटिस्ट्स असोसिएशन यांच्या व इतर अनेक मान्यवर संस्थांच्या त्या आजीव सदस्य आहेत. 'डायटेटिक्स'-आजारपणातील आहार हा त्यांचा व्यवसाय आणि आहारविषयक प्रबोधन हा त्यांव्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

धुरू यांनी लीलावती भागवत यांच्या मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावरील वनिता मंडळ या कार्यक्रमात अनेक वेळा भाग घेतला. तेथे धुरू यांना प्रसिद्धी मिळाली..

रघुनाथ धनाजी पाटील हे धुरू यांचे वडील होत.

पुस्तके[संपादन]

  • आहाराविषयी सारे काही...
  • घरट्यातल्या चिमण्या (स्त्रियांच्या कथा)
  • जासूस मुन्ना आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • झटपट सुगरण : व्हेज् + नाॅनव्हेज्
  • प्रपितामह काशिनाथ देवाजी धुरू आणि सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज (चरित्र व इतर माहिती)
  • केक्स व कुकीज : केकस, बिस्किट्स, नानकटाई, इत्यादी
  • मध्यम वय सावध आहार
  • चिंगलान् : चायनीज कुकरी
  • लोणची-मुरांबे-जॅम-जेली-सरबते
  • विज्ञान विशारदा : पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांच्या आठवणी
  • सडपातळ व्हा, सडपातळ राहा : वजन घटविण्यासाठी अनेक उपाय व उपचारपद्धती, तसेच बांधेसूद राहण्यासाठी सौम्य आहारनियमनांच्या शास्त्रशुद्ध पाकककृती
  • सॅलड्स् & कोशिंबिरी