वसंत विष्णू कुळकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी हे ग्रंथालय क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. १९५४ पासून १९८७ पर्यंत विविध ठिकाणी त्यांनी ग्रंथपाल म्हणून कार्य केले. नागपूर विद्यापीठाचे प्रकाशन अधिकारी म्हणून ते १९८५ साली सेवानिवृत्त झाले. ग्रंथालयशास्त्र विभागातील त्यांचे संशोधन आणि लेखन मौलिक समजले जाते.

नागपूर विद्यापीठ, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ इ. प्रतिष्ठानांच्या विविध समित्यांवर त्यांनी तज्ज्ञ- सल्लागार म्हणून काम केले आहे.

ग्रंथालय आणि माहितीशास्त्रावर त्यांनी ग्रंथलेखन केले आहे. ‘ग्रंथालय प्रशासन’, ‘ग्रंथसूचीचे प्रकार’, ‘संगणक मार्गदर्शिका’ हे त्यापैकी काही ग्रंथ. याशिवाय त्यांनी सुमारे बारा ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे; महाराष्ट्र साहित्य परिषद आदी संस्थातर्फे त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी यांची पुस्तके[संपादन]

  • ग्रंथसूचीचे प्रकार
  • ग्रंथालय प्रशासन
  • मराठी प्रबंध सूची : (सुमारे ७५८ मराठी प्रबंधांची सूची)
  • वैदर्भीय ग्रंथसंपदा २००६
  • संगणक मार्गदर्शिका
  • संदर्भसाधनेचे प्रकार

सन्मान[संपादन]

  • महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे; महाराष्ट्र साहित्य परिषद आदी संस्थातर्फे पुरस्कार (इ.स. २०१०)
  • विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणारी ‘साहित्य वाचस्पती’ ही मानद उपाधी कुळकर्णींना मिळाली आहे.