Jump to content

चौरस मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वर्ग मीटर या पानावरून पुनर्निर्देशित)
चित्र:वर्गमीटर.jpg
प्लास्टिकच्या नळ्यांनी आखलेला एक चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला चौकोन

एक चौरस मीटर म्हणजे १ मीटर लांब आणि १ मीटर रुंद एवढ्या चौरसाने व्यापलेल्या क्षेत्रफळाचे माप होय. प्रत्यक्षात एक चौरस मीटर क्षेत्रफळ असण्यासाठी चौरसाऐवजी कोणतीही दुसरी द्विमिती आकृती चालते. उदा० ‘एक भागिले पायचे वर्गमूळ’ इतकी मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ एक चौरस मीटर होईल. किंवा एक मीटर उंची आणि दोन मीटर पाया असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही एक चौरस मीटर असेल.