Jump to content

वर्ग:मापन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मापन पद्धतीचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत.

  • ब्रिटीश (एफ.पी. एस.)पद्धती [फूट पाउंड सेकंद या इंग्रजी शब्दांचे आद्याक्षर घेउन बनलेले लघुरुप]
  • मेट्रिक (एम.के. एस.) पद्धती [मीटर किलोग्राम सेकंद या इंग्रजी शब्दांचे आद्याक्षर घेउन बनलेले लघुरुप]
  • आंतरराष्ट्रीय (एस.इ.)पद्धती

ही पद्धत मुख्यत: युनायटेड कींग्डम आणि अमेरीकेत वापरली जाते. या पद्धतीत फूट, पौंड, व सेकंद ही तीन मुलभुत एकके आहेत. या मुलभुत एककापासुन योग्य ती नवीन एकके बनवता येतात. उदा: गतीचे एकक फूट व सेकंद वापरुन "फूट दर सेकंद" असे बनविता येते.

येथे मीटर, कीलोग्राम, व सेकंद ही एकके (युनीट्स्) आहेत. आजच्या काळात जवळपास सर्व देशात ही पद्धत वापरण्यावर भर आहे. ह्या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे,एकके दहाच्या पटीत असतात. त्यामुळे मापन करणे सोपे जाते.

१० मी.मी. = १ से.मी.

१० से.मी. = १ डेसी मी.

१ डेसी मी. = १ मीटर

१० मीटर = १ डेका मी.

१० डेका मी. = १ हेक्टो मी.

१० हेक्टो मी.= १ की.मी.

ही पद्धत जगभरातील मापनपद्धतींत समानता आणण्यासाठी आणि मुख्यत्वे संशोधनात वापरण्यासाठी तयार केली गेली आहे. या पद्धतीत आणि मेट्रिक पद्धतीत थोडी समानता आहे.

उपवर्ग

एकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.