Jump to content

लैंगिक इच्छा विकृती बिघाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लैंगिक इच्छा बिघाड प्रकार

लैंगिक इच्छा विकृती

[संपादन]

या प्रकारात कोणताही जैविक बिघाड नसतो तरी देखील या विकृती मध्ये लैंगिक प्रेरणेचा अभाव दिसून येतो. व यामुळे जोडीदार अपुऱ्या लैंगिकसंबधाबाबत तक्रार करताना दिसून येतात.

स्त्रियामधील लैंगिक उद्दीपन भावना बिघाड

[संपादन]

या विकारात प्रामुख्याने स्त्रियांमध्ये लैंगिक उद्दीपनाचा अभाव दिसून येतो. या स्त्रिया रतिक्रीडेमध्ये आपल्या जोडीदाराला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत.

शारीरिक वैशिष्ट्य

[संपादन]

यात स्त्रियांचा योनीमार्ग आकुंचन पावलेला असल्याने शारीरिक सुखापेक्षा वेदनाच जास्त होतात तसेच योनीमार्ग कोरडा पडला असल्याने तसेच वेदना जास्त होत असल्याने या स्त्रिया रतिक्रीडेमध्ये आपल्या जोडीदाराला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत. त्रासाची भावना वाढल्या कारणाने आंतरव्यक्तीक समस्या निर्माण होतात व वाढतात.

इतर कारणे व उपचार

[संपादन]
  • रतिक्रीडे बद्दल धास्ती व लैंगिक कृतीबद्दल चुकीचे समज
  • विकृती मानसिक व ऐंद्रिय कारणाने झालेली असल्यास मानसोपचाराचा उपयोग होतो.
  • अलीकडील काळात नवनवीन प्रभावी औषधे उपलब्ध असल्याने योनीमार्ग उपचार सोयीस्कर झालेले आहेत.