लैंगिकता हक्कांच्या चळवळी ही एक मोठी संकल्पना आहे ज्यात अनेक चळवळी ज्या लैंगिक हक्कांसाठी वेगवेगळ्या मार्गांने आणि सामाजिक स्थानांवरून उभ्या राहिल्या आहेत.
त्यांचे आपल्याला ढोबळमानाने निम्नानुसार वर्गीकरण करता येते.
१) लैंगिक सेवा पुरविणाऱ्यांच्या चळवळी
२) समलिंगी आणि उभयलिंगी लैंगिकता असणाऱ्यांच्या चळवळी
३) हिजडे आणि इतर लिंगभाव असलेल्यांच्या हक्कांच्या चळवळी
४) लहान मुलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणाच्या चळवळी