Jump to content

लेट्युस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लुआ(Lua) त्रुटी विभाग:Autotaxobox मध्ये 156 ओळीत: attempt to index a nil value.
लेट्युस
कॅलिफोर्निया मधील लेट्युसचा वाफा
Scientific classification edit
Species:
Binomial name
साचा:Taxon infoसाचा:Taxon italics
Synonyms[] []
  • लैक्टुका स्कारिओला वेर. सॅटिवा (मॉरिस)
  • एल. स्कारिओला वेर. एकीकरण (ग्रॅन. आणि गोडर.)
  • एल. स्कारिओला वेर. इंटिग्रीफोलिया (जी. बेक)

लेट्युसचे झाड (वैज्ञानिक नाव: लॅक्टुका सॅटिवा) डेझी कुटूंबातील एस्टेरासीचे आहे. ही एक वार्षिक वनस्पती आहे जी उगवण्यापासून ते बियाणे तयार होईपर्यंत, एका उगवत्या हंगामात त्याचे जीवन चक्र पूर्ण करते आणि नंतर मरते. हे बहुतेकदा पालेभाजी म्हणून पिकविली जाते, परंतु कधीकधी त्याच्या देठासाठी आणि बियाण्यासाठी हे पीक घेतले जाते. लेट्युस बहुतेक वेळा सॅलडसाठी वापरली जाते. हे सूप, सँडविच आणि रॅप्स सारख्या इतर प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरले जाते. ते कोळशावर भाजता (ग्रील्ड) देखील येते. [] याचा एक प्रकार, वजू (莴苣) किंवा शतावरी लेट्यूस (सेल्टस), त्याच्या देठासाठी पिकवले जाते, ते एकतर कच्चे किंवा शिजवलेले खाल्ले जाते. हिरवी पालेभाजी म्हणून त्याच्या मुख्य वापर आहे. त्याव्यतिरिक्त शतकानुशतके मानवाने धार्मिक आणि औषधांसाठी देखील याचा वापर केला आहे. सुरुवातीला युरोपचे आणि उत्तर अमेरिकेचे लेट्युसच्या बाजारात वर्चस्व होते, परंतु २० व्या शतकाच्या उत्तरार्धात लेट्युस जगभर पसरले. २०१७ वर्षात लेट्युस आणि चिकोरीचे जागतिक उत्पादन २७ दशलक्ष टन होते, त्यातील ५६% उत्पादन चीनमध्ये झाले होते. []

लेट्युस सर्वप्रथम प्राचीन इजिप्शियन लोकांनी वापरात आणेले. ते त्याच्या बियांपासून तेल तयार करत. त्याचे रसदार पाने आणि तेलाने भरलेल्या बियांमुळे याचे नंतर खाद्य वनस्पतीमध्ये रूपांतरण करण्यात आले. लेट्युस ग्रीक आणि रोमन लोकांमध्ये पसरले. त्यांनी त्याला लॅक्टुका असे नाव दिले ज्यापासून इंग्रजी शब्द लेट्युस आला. ५० एडी पर्यंत, याचे बरेच प्रकार वापरात आले. लेट्युसचा वापर अनेक वनौषधींमध्ये झालेला मध्ययुगीन काळात दिसून येतो. १६ व्या ते १८ व्या शतकात युरोपमधील अनेक जातींचा विकास झाला. १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत तयार झालेली झाडे आजही बागांमध्ये दिसून येतात.

लेट्युसची लागवड सहज होते. कमी तपमानात याला फुले उशीरा येतात. याव फार पटकन रोग येता, तसेच याचे भक्षण कीटक आणि सस्तन प्राणी, बुरशी आणि बॅक्टेरिया करतात. एल. सॅटिव्हा प्रजातींमध्ये आणि काही इतर प्रजातींसह लॅक्टुका या जातीमध्ये सहजपणे दिसून येतो. यामूळे झाडातून बिया नष्ट होतात. हे गुणधर्म बियाणे वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्रासदायक ठरते, तरीही जीवशास्त्रज्ञांनी लेट्युसच्या बियांचे जनुकीय वर्ग विस्तृत ठेवला आहे. लेट्युसमध्ये जीवनसत्त्वे के आणि ए मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच फोलेट आणि लोह हे मध्यम प्रमाणात सापडतात. दूषित लेट्युस बहुतेक वेळा ई. कोलाई आणि साल्मोनेला सह बॅक्टेरिया, विषाणूजन्य आणि परजीवी किटकांच स्रोत बनतो.

वर्णन

[संपादन]
लेट्युसची फुले
लेट्युसचे फळ

लेट्यूसची मूळतः भूमध्य ते सायबेरिया पर्यंत सर्वत्र आढळते. सध्या हे जगातील बहुतेक भागात आढळते. या झाडांची साधारणत: उंची १५ ते ३० सेमी (६ ते १२ इंच) पर्यंत असते. [] पाने रंगीबेरंगी असतात, मुख्यत: हिरव्या आणि लाल रंगाच्या छटांमध्ये असतात. [] काही प्रकारच्या लेट्युसच्या झाडांना पिवळ्या, सोनेरी किंवा निळ्या छटांचीही पाने असतात. [] लेट्युसमध्ये विविध आकार आणि पोत असतात. लेट्युसचे झाड वेगवेगळ्या प्रकारचे दिसते उदा, आईसबर्ग, घनदाट पाने, कुंपण, स्कॅलोपड, फ्रिली किंवा असभ्य पानांसारखे. [] लेट्युसमध्ये एक मुख्य टप्रूट (मुळ) आणि लहान दुय्यम प्रकारची मुळे असतात. काही प्रकारांत, विशेषतः युनायटेड स्टेट्स आणि पश्चिम युरोपमध्ये आढळणाऱ्या जातींमध्ये लांब, अरुंद टप्रूट्स आणि गौण मुळांचा एक छोटासा समूह असतो. आशियामधील जातींमध्ये लांब टप्रूट आणि अधिक विस्तृत दुय्यम प्रणाली मुळे असणारी झाडे आढळतात. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Lactuca sativa". Kew Royal Botanical Gardens. 2012-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 April 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Lactuca serriola L". United States Department of Agriculture. 5 June 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 April 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Hugh Fearnley-Whittingstall. "Grilled lettuce with goats' cheese". BBC. 17 July 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 May 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Lettuce (with chicory) production in 2017; Countries/Regions/Production Quantity from pick lists". UN Food & Agriculture Organization, Statistics Division (FAOSTAT). 2018. 13 September 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Lactuca sativa". Missouri Botanical Garden. 16 June 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 March 2012 रोजी पाहिले.
  6. ^ a b Fine Cooking Magazine (2011). Fine Cooking in Season: Your Guide to Choosing and Preparing the Season's Best. Taunton Press. p. 28. ISBN 1-60085-303-X.
  7. ^ a b Ryder, J.; Waycott, Williams (1993). "New Directions in Salad Crops: New Forms, New Tools, and Old Philosophy". In Janick, J and Simon J.E (ed.). New Crops. Wiley. pp. 528–532. 17 July 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 April 2012 रोजी पाहिले.