लुहान्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लुहान्स्कचे नकाशावरील स्थान

लुहान्स्क
युक्रेनमधील शहर

Luhansk collage.jpg

Flag of Luhansk.svg
ध्वज
Coat of arms of Luhansk.svg
चिन्ह
लुहान्स्क is located in युक्रेन
लुहान्स्क
लुहान्स्क
लुहान्स्कचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 48°34′18″N 39°17′50″E / 48.57167°N 39.29722°E / 48.57167; 39.29722

देश युक्रेन ध्वज युक्रेन
स्थापना वर्ष इ.स. १७९५
समुद्रसपाटीपासुन उंची ३४४ फूट (१०५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,००,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०३:०० (पूर्व युरोपीय प्रमाणवेळ)


लुहान्स्क (युक्रेनियन: Луганськ; रशियन: Луганск) हे पूर्व युरोपाच्या युक्रेन देशामधील युक्रेन-रशिया सीमेजवळील एक शहर आहे. युक्रेनच्या पूर्व भागातील दोनबास ह्या वादग्रस्त भूभागातील लुहान्स्क शहर आजच्या घडीला लुहान्स्क जनतेचे प्रजासत्ताक नावाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अमान्य असलेल्या राष्ट्राचे मुख्यालय आहे. २०१४ सालापर्यंत हे शहर युक्रेनच्या लुहान्स्क ह्याच नावाच्या ओब्लास्ताचे मुख्यालय होते.

इ.स. १७९५ मध्ये स्थापन झालेले लुहान्स्क पूर्व युरोपामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर बनले होते. सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखाली असताना ह्या शहराचे नाव बदलून व्होरोशिलोवग्राद असे ठेवण्यात आले होते. २०१४ सालापासून लुहान्स्क व दोनेत्स्क प्रांतांमध्ये रशियाच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या फुटीरवादी चळवळींचे रूपांतर युद्धात झाले व फुटीरवादी गटाने २५ जुलै २०१४ रोजी लुहान्स्क जनतेचे प्रजासत्ताक ह्या स्वतंत्र देशाची घोषणा करून लुहान्स्कला ह्या नव्या देशाच्या राजधानीचे शहर बनवले. आजच्या घडीला रशिया वगळता जगातील इतर कोणत्याही देशाने ह्या राष्ट्राला मान्यता दिलेली नाही.

बाह्य दुवे[संपादन]